• January 1, 2025
  • No Comment

मशिनमध्‍ये अडकलेल्‍या तरुणाची सुटका; पिंपरी चिंचवड अग्‍निशामक दलाची उल्लेखनीय कामगिरी

मशिनमध्‍ये अडकलेल्‍या तरुणाची सुटका; पिंपरी चिंचवड अग्‍निशामक दलाची उल्लेखनीय कामगिरी

    पिंपरी: आरएमसी कॉंक्रिट पंप मशिनमध्‍ये अडकलेल्‍या तरुणाची पिंपरी चिंचवड अग्‍निशामक दलाच्‍या जवानाने सुखरूप सुटका केली. ही घटना मंगळवारी रात्री पिंपळे सौदागर येथील शिवार गार्डन चौकाजवळ घडली.

    भागवत घुगे (वय २५) असे सुटका केलेल्‍या तरुणाचे नाव आहे.

    लिंडींग फायरमन सारंग मंगरूळकर यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, मंगळवारी रात्री नऊ वाजताच्‍या सुमारास एकजण मशिनमध्‍ये अडकला असल्‍याची माहिती अग्‍निशामक दलास मिळाली. त्‍यानुसार रहाटणी आणि अग्‍निशामक मुख्‍यालयातून प्रत्‍येकी एक बंब घटनास्‍थळी दाखल झाला. आरएमसी कॉंक्रिट पंप मशिनमध्‍ये एका तरुणाचा पाय अडकल्‍याचे दिसून आले. रॉड कटींग ग्रॅडर, बोल्‍ट कटर सेपरेटर या मशिनच्‍या मदतीने अडकलेल्‍या तरुणाची अवघ्‍या १५ मिनिटांमध्‍ये सुटका करण्‍यात आली.

    सदरची कामगिरी लिंडींग फायरमन सारंग मंगरूळकर, यंत्रचालक रुपेश जाधव, काशिनाथ ठाकरे, सरोज फुंडे, भूषण येवले, वाघेरे, पवार, मोरे, गावडे, पाटील, दरवेश, बल्‍लाळ, तोडनकर, उचाळी यांच्‍या पथकाने केली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *