• January 2, 2025
  • No Comment

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; खूनाच्या प्रयत्नातील आरोपी जेरबंद

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; खूनाच्या प्रयत्नातील आरोपी जेरबंद

    पुणे: खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पसार होण्याच्या तयारीत असलेल्या सराइत गुन्हेगाराला स्वारगेट पोलिसांनी एसटी स्थानकाच्या आवारात सापळा रचून पकडले.

    बस स्थानकात कारवाईचा थरार घडला. त्यामुळे प्रवासी कुतूहलाने पोलिसांच्या या कारवाईकडे पहात होते. तो सोलापूर येथे जाण्याच्या तयारीत होता.

    अमोल रवी आडम (वय २४ रा. प्रथमेश अपार्टमेंट, शंकरनगर, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या सराइताचे नाव आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, सहायक निरीक्षक राहुल कोळंबीकर, संजय भापकर, कुंदन शिंदे, शंकर संपत्ते, सागर केकाण, राहुल तांबे, सुधीर इंगळे, सतीश कुंभार, विक्रम सावंत, शरद गोरे यांनी ही कारवाई केली.

    अमोल हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरूद्ध भारती विद्यापीठ, येरवडा, विश्रांतवाडी, कोंढवा पोलीस ठाण्यात अपहरण, खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध स्थान बद्धतेची कारवाई केली होती. तो नुकताच या गुन्ह्यातून सुटून बाहेर आला होता.

    दरम्यान आडम आणि साथीदारने १७ डिसेंबर रोजी कात्रज भागातील आंबेगाव परिसरात दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले होते. गुन्हा केल्यानंतर तो पसार झाला होता. त्याचा शोध पोलीस घेत होते. यावेळी स्वारगेट पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार कुंदन शिंदे व राहुल तांबे यांना माहिती मिळाली की, आडम मूळगावी सोलापूर जाणार आहे. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात सापळा लावला. अमोल आडम बस स्थानकात आल्यानंतर सोलापूर बसकडे जात असताना त्याला पथकाने त्याला पकडले.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *