• January 2, 2025
  • No Comment

हौसेखातर कमरेला पिस्टल लावून सहकारनगर परिसरात खुलेआम फिरणारा अल्पवयीन मुलगा अटक

हौसेखातर कमरेला पिस्टल लावून सहकारनगर परिसरात खुलेआम फिरणारा अल्पवयीन मुलगा अटक

    पुणे: हौसेखातर कमरेला पिस्टल लावून फिरणार्‍या अल्पवयीन मुलाला सहकारनगर पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून गावठी पिस्टल जप्त केले आहे.

    सहकारनगर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे नव वर्षाच्या आगमनानिमित्त बंदोबस्तासाठी पेट्रोलिंग करीत होते. ते तीन हत्ती चौकात आले असताना पोलीस अंमलदार अमोल पवार यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक जण के के मार्केट च्या पार्किंगच्या जागेतील टीव्हीएस शोरुमचे पाठीमागील गल्लीत कोणाची तरी वाट पहात असून त्याच्या कमरेला पिस्टल सारखे हत्यार लावलेले दिसत आहे.

    वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांनी तातडीने कारवाई करण्यास सांगितले. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील व अंमलदार यांनी मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी बालाजीनगरला जाऊन या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्या पॅन्टमध्ये खोचलेले ६० हजार रुपयांचे गावठी बनावटीचे पिस्टल मॅगझीनसह जप्त केले.

    सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे, सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील, बापू खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, किरण कांबळे, बजरंग पवार, चंद्रकांत जाधव, महेश मंडलिक, अमित पदमाळे, सागर सुतकर, योगेश ढोले, महेश भगत,खंडु शिंदे यांनी केली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *