• January 3, 2025
  • No Comment

बांग्लादेशातून आले, पुण्यात नोकरीही मिळवली; दहशतवादविरोधी पथकाने तिघांना केल जेरबंद

बांग्लादेशातून आले, पुण्यात नोकरीही मिळवली; दहशतवादविरोधी पथकाने तिघांना केल जेरबंद

    पुणे: राज्यातील परप्रांतीयांचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून गाजत असतानाच, रोहिंग्या मुस्लीम आणि बांग्लादेशींचेही वास्तव्य मुंबई, ठाण्यासह पुणे जिल्ह्यातही वाढत असल्याचे अनेक घटनांमधून उघडकीस आलं आहे.

    गैरमार्गाने बांग्लादेशी नागरिक भारतात वास्तव्यास असून गुन्हेगारीशी निगडीत व्यवसाय आणि लहान-सहान धंदे ते करत असल्याचे उघडकीस आलं आहे. आता, पुण्यात नोकरी करणाऱ्या चक्क तीन बांग्लादेशींना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

    घुसखोरीच्या मार्गाने भारतात वास्तव्यास असणाऱ्या तीन बांग्लादेशींना पुण्यात बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तळेगाव एमआयडीसी येथील कंपनीत या तिघांनी बनावट कागदपत्रांच्या साह्याने नोकरीही मिळवली होती. दहशतवाद विरोधी पथकाने कंपनीत छापा टाकून तिघांना अटक केली आहे. हुसेन शेख, मोनिरुल गाझी आणि अमिरुल साना अशी अटक करण्यात आलेल्या बांग्लादेशींची नावं आहेत.

    पुणे पोलिसांनी अटक केलेले तिघेही बांग्लादेशमधील साथखीरा जिल्हाचे रहिवाशी असून सध्या ते तळेगाव एमआयडीसी येथील नवलाख उंबरे परिसरात वास्तव्यास होते. या नागरिकांकडे भारतीय आधारकार्ड,पॅनकार्ड, ई श्रम कार्ड, पश्चिम बंगालमधील जन्म प्रमाणपत्र आणि ग्राम पंचायतीचा दाखल मिळून आला आहे. त्यामुळे, या बांग्लादेशींना इतक्या सहजपणे एवढी कागदपत्रे कशी मिळाली, असा प्रश्न उपस्थित होऊन खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर या आरोपींची झाडाझडती घेतली असता, त्यांच्या मोबाईलमध्ये काही बांगलादेशी ओळखपत्र, पासपोर्ट, जन्म दाखलाही आढळून आला आहे. या नागरिकांच्या मोबाईलवरुन बांग्लादेशमध्ये वारंवार संपर्क झाल्याचंही समोर आले आहे.

    बनावट कागदपत्रांच्या आधारे तळेगाव एमआयडीसी परिसरातील श्री निवास या वाहनांच्या स्पेअर पार्टस बनविणाऱ्या कंपनीत त्यांनी नोकरी मिळवली होती. या कंपनीत ते गेल्या आठ महिन्यापासून काम करत होते, तसेच कंपनी परिसरातील खोलीतच राहायला देखील होते. मात्र ते भारतात कसे, कधी अन कुठून आले? तसेच बनावट कागदपत्रे कधी, कुठून आणि कोणामार्फत मिळवली? याचा शोध पिंपरी चिंचवड पोलीस घेत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *