• January 3, 2025
  • No Comment

चक्क चौकशी दरम्यान पोलिसांना शिवीगाळ, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

चक्क चौकशी दरम्यान पोलिसांना शिवीगाळ, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

    पुणे: पोलीस चौकीत गोंधळ घालून पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याची घटना घडली. शनिवार पेठ पोलीस चौकीत हा प्रकार घडला असून, याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

    याप्रकरणी अथर्व रामचंद्र जोशी (वय २२, रा. विश्वकमल काॅम्प्लेक्स, नारायण पेठ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस शिपाई प्रसाद ठाकूर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    पोलिसांच्या माहितीनुसार, नववर्षाच्या मध्यरात्री एकच्या सुमारास दुचाकीस्वार अथर्व भरधाव वेगात निघाला होता. त्यावेळी त्याने एका दुचाकीस्वार महिलेला धडक दिली. अपघातात महिलेच्या दुचाकीचे नुकसान झाले. नंतर महिलेने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. बंदोबस्तावरील पोलिसांनी अथर्वला ताब्यात घेतले. त्याला शनिवार पेठ पोलीस चौकीत नेले. तेव्हा त्याने पोलीस चौकीत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

    पोलीस चौकीत त्याने तक्रारदार महिलेसह पोलिसांना शिवीगाळ केली. पोलीस शिपाई ठाकूर आणि इनामदार यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी अथर्ववर गुन्हा दाखल केला असून, उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर तपास करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *