• January 3, 2025
  • No Comment

पुण्यातील खुनाचा 12 तासात छडा, दोन टाळकी गजाआड

पुण्यातील खुनाचा 12 तासात छडा, दोन टाळकी गजाआड

    पुणे: औंध येथील एका युवकाचा सुतारखडवी परिसरात मृतदेह आढळून आला. औंध पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या १२ तासात दोघांना अटक करून खुनाचा उलघडा केला. रामदास अशोक दंडवते (वय २८, रा.औंध) असे मृताचे नाव आहे.

    शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास रोहन मल्हारी मदने, गुरुराज दत्तात्रय मदने व रामदास दंडवते सुतार खडवी परिसरात मद्यपान करत बसले होते. दरम्यान, तिघांमध्ये वादावादी सुरू झाली. त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. यामध्ये संशयित रोहन मदने याने रामदास दंडवते याच्या डोक्यात दगड घातल्याने रक्तस्राव होऊन मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह कोणास सापडू नये म्हणून दोन्ही संशयितांनी सुतार खडवीजवळच्या झाडीत लपवून ठेवला. सुमारे १० दिवस हा मृतदेह झाडीतच होता.

    पाेलिसांनी लोणंद येथून मंगळवारी पहाटे चार वाजता गुरुराज मदने यास अटक केली. अविनाश मते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सतीश मयेकर, अनिल शिरोळे, अविनाश वाघमारे, पोलिस हवालदार राहुल वाघ, दादासाहेब देवकुळे, पोलिस कॉन्स्टेबल साहिल झारी, प्रमोद इंगळे यांनी ही कारवाई केली.

    सहायक पोलिस निरीक्षक अविनाश मते यांच्या मार्गदर्शनाखाली गोपूज, औंध, खरशिंगे परिसरात तपास केल्यानंतर रामदास दंडवते याचा मृतदेह गोपूजनजीक सापडला. याबाबत तक्रार लीला अशोक दंडवते यांनी दिली. घटनास्थळी कोरेगावच्या पोलिस उपअधीक्षक सोनाली कदम यांनी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी संशयित रोहन मदने यास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. यात त्याने गुन्ह्याची कबुली देताना चुलते गुरुराज दत्तात्रय मदने सहभागी असल्याचे सांगितले.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *