- January 3, 2025
- No Comment
कीरकोळ वादात तरुणावर तलवारीने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, आरोपी जेरबंद

पिंपरी: वर्षाचे आगमन साजरे करत असताना ऑफर केलेली दारू पिण्यास नकार देणार्या तरुणावर तलवारने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.
भोसरी पोलिसांनी वर्कशॉपच्या मालकाला अटक केली आहे.
नवप्रित अजितसिंग संधु (वय २९, रा. इंद्रायणीनगर पोलीस लाईन, भोसरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या घटनेत अनुज फेबीयन के अे (वय २८, रा. अॅन्टलॉन सिटी, दापोडी) हा तरुण जखमी झाला आहे. ही घटना भोसरीतील गुळवे वस्तीतील नवप्रितसिंग संधु याच्या वर्कशॉपमध्ये १ जानेवारीला पहाटे १ ते ३ वाजेच्या दरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शिक्षण घेत आहेत. नव वर्षानिमित्त पार्टीसाठी ते नवप्रितसिंग संधु याच्या वर्कशॉपवर आले होते. तेथे सर्व जण दारु पित होते. संधु याने अनुज याला दारु पिण्याची ऑफर केली. त्याला त्याने नकार दिला. दारुच्या नशेत असलेल्या संधुला त्याचा राग आला. त्याने वर्कशॉपमधील तलवारीने अनुज याच्या कपाळावर व मानेवर जोरात वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन संधु याला अटक केली आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दशवंत करीत आहेत.