• January 3, 2025
  • No Comment

तोतया पीएसआयने महिलेला १५ लाखाला घातला गंडा, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

तोतया पीएसआयने महिलेला १५ लाखाला घातला गंडा, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

    पिंपरी: टेलिकॉम डिपार्टमेंटमधील प्रतिनिधी आणि पोलिस असल्याचे भासवून एका महिलेच्या नावाने मनी लॉन्डरिंग झाल्याचे सांगत महिलेची १५ लाख २५ हजार रुपयांनी फसवणूक केली. ही घटना २ डिसेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत वाकड येथे घडली.

    याप्रकरणी ३४ वर्षीय महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एक अज्ञात व्यक्ती आणि पोलिस उपनिरीक्षक हेमराज कोळी असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तीने फिर्यादी महिलेला फोन करून ती टेलिकॉम डिपार्टमेंट ऑफ इंडियामधून बोलत असल्याचे खोटे सांगितले. फिर्यादी यांच्या नावाने सिम कार्ड खरेदी करून १५ ते २० लोकांना बेकायदेशीर मेसेज पाठवण्यात आले आहेत. तसेच त्या सिम कार्डचा वापर मनी लॉन्डरिंगसाठी केला आहे. त्याबाबत टिळकनगर पोलिस ठाणे, मुंबई आणि अंधेरी पोलिस ठाणे, मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगितले. पोलिस उपनिरीक्षक हेमराज कोळी असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीने फिर्यादी यांच्या खात्यावरून २५ कोटींचे व्यवहार झाले असल्याचे खोटे सांगितले. फिर्यादीकडून १५ लाख २५ हजार रुपये पाठवण्यास सांगून त्यांची फसवणूक केली.

    पुढील तपास वाकड पोलिस करीत आहेत.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *