• January 3, 2025
  • No Comment

खंडणी न दिल्याने तरुणाची दहशत

खंडणी न दिल्याने तरुणाची दहशत

    पिंपरी: झेरॉक्स दुकानदार महिलेकडे दोन हजारांची खंडणी मागितली. मात्र खंडणी देण्यास महिलेने नकार दिला असता एका तरुणाने दुकानाच्या काउंटरवर आणि दुकानासमोरील वाहनांवर लाकडाने मारून नुकसान केले. तसेच परिसरात दहशत निर्माण केली.

    अशोक दुर्गा पवार (वय १९, रा. बालाजीनगर, भोसरी) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी ४७ वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अशोक फिर्यादी महिलेच्या झेरॉक्स दुकानात आला.

    त्याने महिलेकडे दोन हजार रुपयांची खंडणी मागितली. मात्र खंडणी देण्यास महिलेने नकार दिला. त्यानंतर अशोक याने दुकानाच्या काउंटरवर आणि दुकानासमोरील वाहनांवर दांडक्याने मारून नुकसान केले. अशोक याच्या दहशतीला घाबरून आजूबाजूचे लोक घरात गेले. त्यानंतर अशोक याने परिसरातील दुचाकी वाहनांची तोडफोड करून नुकसान केले.

    एमआयडीसी भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *