• January 3, 2025
  • No Comment

लोखंडी रॉड अन् दगडाने ठेचून मुलाचा खून; तीन आरोपी गजाआड

लोखंडी रॉड अन् दगडाने ठेचून मुलाचा खून; तीन आरोपी गजाआड

    वाघोली: नगर रस्त्यावरील वाघोली भागात वाघेश्वरनगर येथे एका अल्पवयीन मुलाचा लोखंडी रॉड तसेच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला बोलत असल्याच्या रागातून हा खून झाल्याचे सांगण्यात आले आहे.

    प्रेमप्रकरणातून खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

    गणेश वाघू तांडे (१७) असे हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण पेटकर (वय ६०), नितीन पेटकर (वय ३१) आणि सुधीर पेटकर (वय ३२) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास घडली आहे.

    पोलिसांच्या माहितीनुसार, गणेश तांडे याचे कुटूंब व पेटकर कुटूंब एकाच भागात राहण्यास आहेत. गणेश हा पेटकर यांच्या मुलीशी बोलत असल्याचा संशय कुटूंबियांना होता. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. दरम्यान, मंगळवारी रात्री साडे बाराच्या सुमारास गणेश नेहमीप्रमाणे मित्रासोबत वस्तीत थांबलेला होता. तेव्हा वडिल तसेच त्यांची दोन मुले येथे आली. त्यांनी गणेशला गाठले. तिघांनी गणेशवर लोखंडी रॉड आणि दगडाने हल्ला केला. हल्ला इतका क्रूर होता की, गणेशचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी येथे धाव घेतली. तसेच, तिघांना ताब्यात घेतले. घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *