• January 3, 2025
  • No Comment

धनकवडीत दहशत माजवून वाहनांची तोडफोड; टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

धनकवडीत दहशत माजवून वाहनांची तोडफोड; टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

    धनकवडी (पुणे): धनकवडीत कोयते उगारुन टोळक्याने चार मोटारी, तसेच दुचाकींची तोडफोड केल्याची घटना घडली. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

    तोडफोड प्रकरणात साहिल दुधाणे याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत पियुष मोहन चव्हाण (वय २०, रा. ओम शिवशंभो हाईट्स, मोहननगर, धनकवडी) याने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दुधाणे याच्याशी चव्हाण याचा वाद झाला होता. बुधवारी रात्री आरोपी दुधाणे आणि साथीदारांनी चव्हाणला धनकवडी परिसरात अडवले. चव्हाण आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांना कोयत्याचा धाक दाखविला. मला धनकवडीचा भाई म्हणतात, असे सांगून त्याने त्यांच्यावर कोयते उगारले. त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.

    आरोपींनी धनकवडीतील बसथांब्याजवळ रस्त्यावर लावलेल्या चार मोटारींच्या काचा फोडल्या, तसेच दोन दुचाकींची तोडफोड केली. चव्हाण याला धमकावून आरोपी मोटारीतून पसार झाले. या घटनेची माहिती मिळतात वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांनी घटनास्थळी भेट दिली. हवालदार चव्हाण पुढील तपास करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *