• January 3, 2025
  • No Comment

धक्कादायक! प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलीचा खुन, तब्बल 56 दिवसांनी आरोपी गजाआड

धक्कादायक! प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलीचा खुन, तब्बल 56 दिवसांनी आरोपी गजाआड

    पुणे: अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध असताना दुसर्‍या मुलीशी लग्नाची तयारी त्याने केली होती. त्यातून झालेल्या वादातून त्याने अल्पवयीन मुलीचा खुन केला.

    त्यानंतर मित्राच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरुन दिवे घाटात टाकून दिला. त्यानंतर काहीही झाले नाही असे भासवत त्याने दुसर्‍या मुलीशी विवाह केला. मुलीच्या नातेवाईकांनी तिच्या हरविल्याची तक्रार दिली होती. तिचा मृतदेह दिवे घाटात सापडला. त्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. बेपत्ता मुलीच्या खुनाचा गुन्हा तब्बल ५६ दिवसांनी उघडकीस आला. लोणीकंद पोलिसांनी दोघांना अटक केली.

    बालाजी रामराव हिंगे म (वय २५) आणि त्याचा मित्र सचिन संजय रणपिसे (वय २६, दोघे रा़ फुलगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजीचे एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते. तरीही तो दुसर्‍या मुलीशी विवाह करण्याच्या तयारीत होता. सुमारे दोन महिन्यांपूर्वी बालाजी व ही मुलगी एकत्र बाहेर गेले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. तेव्हा त्याने तिचा खुन केला. इकडे मुलगी बेपत्ता झाल्याने तिच्या कुटुंबियांनी २ नोव्हेंबर रोजी हरविल्याची तक्रार लोणीकंद पोलीस ठाण्यात दिली. तिचा शोध घेतला जात होता. परंतु, तिचा तपास लागत नव्हता. त्यानंतर ५६ दिवसांनी तिचा मृतदेह दिवे घाटात टाकल्याचा पोलिसांना सुगावा लागला. २८ डिसेंबर रोजी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लोणीकंद पोलिसांनी या खुनाबद्दल दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यात त्यांनी खुनाची कबुली दिली.

    मुलीचा खुन केल्यानंतर त्यांनी तिचा मृतदेह दोन दिवस एका वाहनात ठेवला. त्यानंतर दोघे आरोपी मृतदेह घेऊन दिवे घाटात गेले व त्यांनी एका ठिकाणी मृतदेह पोत्यात टाकून तो घाटात फेकून दिला.

    बालाजी याने या मुलीचा खुन करुन मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर काहीच झाले नाही, अशी त्याची वागणूक होती. त्यानंतर त्याने ठरल्याप्रमाणे १५ दिवसात दुसर्‍या मुलीशी विवाह केला. त्यावेळी नवरदेव असलेल्या बालाजीने एका मुलीचा खुन केला आहे, याची कोणालाच कल्पना नव्हती.

    Related post

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे: गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या निवडणुकीत यंदा एकूण ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार…
    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर गाड्यांचे अतिक्रमण; नागरिक त्रस्त

    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर…

    पुण्यातील कसबा पेठ परिसरात न्यू गंधर्व बँड या व्यवसायिकाकडून अनधिकृत शेड उभारणे, डेकोरेशनचे साहित्य सार्वजनिक जागांवर अस्ताव्यस्त ठेवणे आणि बँडच्या गाड्या…
    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    पुणे: कदमवाकवस्ती गावामध्ये पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यासंदर्भात संबंधित प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांचा पंचनामा देखील करण्यात आला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *