• January 3, 2025
  • No Comment

परप्रांतीय केअर टेकर तरुणानेच 80 वर्षाच्या वृद्धाचे हातपाय बांधून पळविली रोकड

परप्रांतीय केअर टेकर तरुणानेच 80 वर्षाच्या वृद्धाचे हातपाय बांधून पळविली रोकड

    कोरेगाव पार्क (पुणे): केअर टेकर म्हणून नेमलेल्या तरुणानेच ८० वर्षाच्या ज्येष्ठाचे हातपाय बांधून चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम व मोबाईल चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुदैवाने त्यांनी आरडाओरडा केल्याने शेजारच्यांनी येऊन त्यांची सुटका केली.

    याबाबत त्यांचा मुलगा रवींद्र प्रसाद अग्रवाल (वय ५६, रा. गंगा मेलरोजी, सोपानबाग) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चिंटु चर्तुवेदी (वय १९, रा. कुम्हारी, ता. अमरपटन, जि. सतना, मध्य प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कोरेगाव पार्क येथील अग्रसेन सोसायटीत १ जानेवारी रोजी सकाळी पावणे सात ते साडेसात वाजेच्या दरम्यान घडला.

    याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडिल प्रसाद अग्रवाल ८० वर्षांचे असून अग्रसेन सोसायटीत ते एकटेच राहतात. फिर्यादी हे आपल्या कुटुंबासह सोपानबाग येथे राहतात. वडिलांच्या देखभालीसाठी १५ ते २० दिवसांपूर्वी चिंटु चर्तुवेदी याला नेमले होते. तो सकाळीच येऊन घरातील काही कामे व वडिलांना काय हवे नको ते पहात असे. १ जानेवारी रोजी तो नेहमीप्रमाणे सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान आला. त्याने बेडरुममध्ये वडिलांना नॉयलॉनच्या दोरीने बांधले. रुमालाने तोंड बांधुन त्यांना चाकूचा धाक दाखविला. ‘तेरे पास जितना पैसा है, वह मुझे दे दे, नही तो यही चाकू से तेरे को मार दुंगा,’ अशी जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्याकडे असलेली रोख रक्कम व मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. त्यांना बेडरुममध्ये बंद करुन तो पळून गेला. फिर्यादी यांचे वडिल प्रसाद अग्रवाल यांनी कसेतरी करुन तोंडावर बांधलेला रुमाल बाजूला करुन आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून शेजारी राहणार्‍यांनी घरात येऊन त्यांची सुटका केली.

    पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांतामल कोळ्ळुरे करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *