• January 6, 2025
  • No Comment

मराठीत बोललात तर नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी, एअरटेल मॅनेजरला मनसेकडून चोप

मराठीत बोललात तर नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी, एअरटेल मॅनेजरला मनसेकडून चोप

    पुणे: मुंबई आणि ठाणे येथे परप्रांतियांनी मराठी माणसाला मारहाण केल्याची घटना ताजी असताना आता पुण्यातील मराठी-हिंदी वाद समोर आला आहे. ऑफिसमध्ये मराठीमध्ये बोललात तर नोकरीवरून काढून टाकेन, अशी धमकी एअरटेलच्या मॅनेजरने मराठी कर्मचाऱ्यांना दिली आहे.

    त्यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी या मॅनेजरला चांगलाच चोप दिला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वाकडेवाडी येथील एअरटेल ऑफिसमध्ये हा प्रकार घडला आहे. येथील मॅनेजरने तीन महिन्यांपासून येथील कामगारांना पगार दिलेला नव्हता. याशिवाय या कामगारांना सणांची सुट्टीही दिली जात नव्हती. इतकेच नाही तर कोणतीही सेना किंवा राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना घेऊन या, मी मराठी बोलणार नाही. जर इथे कुणी मराठीत बोललं तर नोकरीवरून काढून टाकीन, अशी धमकीच मॅनेजरने दिली होती.

    मॅनेजरच्या या त्रासाला कंटाळून तरुणांनी याची तक्रार मनसेच्या कार्यकर्त्यांना केली. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी एअरटेल ऑफिसमध्ये घुसून या मॅनेजरला चांगलाच चोप दिला. मराठी तरुणांना त्रास दिला तर एकाचवेळी स्वारगेट, वाकडेवाडी, खराडी येथील एअरटेलची कार्यालये फोडू, असा इशाराच मनसे कार्यकर्त्यांनी दिला. या इशाऱ्यानंतर मराठी तरुणांचे पगार करण्यात आले आहेत. तसेच झालेल्या घटनेबाबत मॅनेजरने माफीही मागितली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *