• January 6, 2025
  • No Comment

नवले पूल परिसरात पुन्हा वेश्याव्यवसाय, चार महिलांविरुद्ध गुन्हा

नवले पूल परिसरात पुन्हा वेश्याव्यवसाय, चार महिलांविरुद्ध गुन्हा

पुणे: मुंबई- बंगळुरू बाह्यवळण महामार्गावरील नवले पूल परिसरात वेश्याव्यवसाय करणाऱ्या चार महिलांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन महिन्यांपूर्वी नवले पूल परिसरात पोलिसांनी कारवाई केली होती.

त्यानंतर या भागात पु्न्हा वेश्याव्यवसाय सुरू असल्याची तक्रार नागरिकांनी केली हाेती. वाहतुकीस अडथळा, तसेच अश्लील हावभाब केल्याप्रकरणी गु्न्हा दाखल करण्यात आला.

सिंहगड रस्त्यावरील नवले पूल परिसरात गेल्या काही महिन्यांपासून काही महिला रस्त्यावर थांबून वेश्याव्यवसाय करत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या. या भागातील रहिवाशांनी कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार दोन महिन्यांपूर्वी पोलिसांनी देहविक्रय करणाऱ्या आठ महिलांविरुद्ध कारवाई करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. या महिला रस्त्यावर थांबून अश्लील हावभाव करतात. त्यामुळे या भागातील महिला आणि युवतींना त्रास होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. नवले पुलाशेजारी असलेल्या सेवा रस्त्यावर या महिल्या थांबतात सिंहगड रस्ता पोलिसानी दोन महिन्यापूर्वी येथे कारवाई केली. त्यानंतर या भागात वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांनी थांबणे बंद केले होते. त्यानंतर या भागात पुन्हा वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला थांबून अश्लील हावभाव करत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या.

पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाये पुढील तपास करत आहेत.

Related post

घरात घुसून ९ वर्षीय मुलीवर ‘लैंगिक अत्याचार’; १९ वर्षीय तरूणाला १० वर्षे ‘सक्तमजुरी’

घरात घुसून ९ वर्षीय मुलीवर ‘लैंगिक अत्याचार’; १९ वर्षीय…

पुणे: बेकायदेशीरपणे घरात घुसून नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला १० वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व…
महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक

महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीला लावतो, असे आमिष दाखवून २१ लाख २० हजार रुपये घेतले. मात्र, नोकरीला न लावता तसेच रक्कम परत…
थकबाकीदारांच्या १६ हजार २६५ मालमत्ता सील; महापालिकेकडून धडक कारवाई

थकबाकीदारांच्या १६ हजार २६५ मालमत्ता सील; महापालिकेकडून धडक कारवाई

पिंपरी: मार्च अखेर जवळ येत असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई तीव्र केली आहे. आतापर्यंत तब्बल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *