• January 6, 2025
  • No Comment

अट्टल गुन्हेगारांवर पुणे पोलिसांकडून मोठी कारवाई, तब्बल १०३ गुन्हेगारांना एका वर्षासाठी केलं स्थानबद्ध

अट्टल गुन्हेगारांवर पुणे पोलिसांकडून मोठी कारवाई, तब्बल १०३ गुन्हेगारांना एका वर्षासाठी केलं स्थानबद्ध

    पुणे: काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दररोज तोडफोड, लूटमार, चोरी, सारख्या घटना पुढे येत आहेत. या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आता पुणे पोलीस आयुक्त अमित कुमार यांनी कडक पावलं उचल्यास सुरुवात केली आहे.

    पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील तब्बल १०३ अट्टल गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. गुन्हेगारांवर कायद्याचा वचक बसावा यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचं अमितेश कुमार यांनी सांगितलं आहे.

    पुणे पोलीस आयुक्तांनी धोकादायक गुन्हेगारांना झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्याचे कठोर धोरण राबविले आहे. या गुन्हेगारांना नागपूर, चंदपूर, अकोला, अमरावती, कोल्हापूर, नाशिक अशा राज्यातील विविध कारागृहामध्ये एका वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात येणार आहे.

    महत्त्वाचे म्हणजे यापुढेही गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांकडून अधिकाधिक कठोर व प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येईल, अशी माहितीही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

    २०२४ मध्ये आयुक्तालयातील विविध पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात खुनाचा प्रयत्न, खंडणी, गंभीर दुखापत, जबरी चोरी, वाहन तोड-फोड, रायट, बेकायदेशीर अग्निशस्त्रे, हत्यारे बाळगणे, गावठी हातभट्टी निर्मिती व विक्री अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. अशाप्रकारे गुन्हेकरून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न या गुन्हेगारंकडून करण्यात येतोय, या गुन्हेगारांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *