• January 6, 2025
  • No Comment

दंडात्मक कारवाई केल्याच्या रागातून चक्क वाहतूक पोलिसाला भररस्त्यात लाथाबुक्क्यांनी मारहाण, आरोपी गजाआड

दंडात्मक कारवाई केल्याच्या रागातून चक्क वाहतूक पोलिसाला भररस्त्यात लाथाबुक्क्यांनी मारहाण, आरोपी गजाआड

    आळंदी (पुणे): वाहतूक पोलिसाने दंडात्मक कारवाई केल्याच्या रागातून एका तरुणाने वाहतूक पोलिसाला भररस्त्यात लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना शुक्रवार (दि.३) मरकळ चौक आळंदी येथे घडली.

    आळंदी वाहतूक शाखेतील सहायक पोलिस उपनिरीक्षक अंकुश वाडेकर यांनी शुक्रवारी आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून विजय नामदेव जरे (वय-३३, रा. गोपाळपुरा, चाकण चौक, आळंदी) याला अटक करण्यात आली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाडेकर हे मरकळ चौक, आळंदी याठिकाणी वाहतूक नियमन करीत होते. त्यावेळी जरे याने फिर्यादी वाडेकर यांनी यापूर्वी त्याच्या गाडीवर पावती टाकल्याचा राग मनामध्ये धरून, तुला माहीत नाही का, मी स्थानिक आहे. गाडीवर तू पावती का करतो, तुला इथे राहायचे नाही का?, अशी धमकी दिली. त्यानंतर जरे याने फिर्यादी वाडेकर यांनी घातलेल्या शर्टाची गचांडी पकडून शर्टाची बटने तोडली.

    वाहतूक पोलिस वाडेकर यांच्या गालावर जोरात हाताने चापट मारली. त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, पुन्हा त्याने फिर्यादीच्या डोक्यात व छातीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेमुळे मरकळ चौकात वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, आळंदी पोलिसांनी संशयिताला सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक केली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *