• January 6, 2025
  • No Comment

लाडकी बहीण योजना,20 लाख महिलांना धक्का, खात्यावरची रक्कम पुन्हा सरकारजमा

लाडकी बहीण योजना,20 लाख महिलांना धक्का, खात्यावरची रक्कम पुन्हा सरकारजमा

    कोणताही सारासार विचार न करता एखादी योजान लागू करणे कसे अंगलट येऊ शकते आणि सरकार म्हणून संबंध यंत्रणेलाच कसे तोंडावर पडावे लागू शकते, याची प्रचिती म्हणजे लाडकी बहीण योजना.

    एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तत्कालीन महायुती सरकारने राज्यात मोठ्या प्रमाणावर ही योजना लागू करुन तिचा सरसकट लाभ दिला. ज्यामुळे विधानसभा निवडणूक 2024 मध्ये भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता मिळविण्यासाठी मोठा फायदा झाला. पण, आता ही वादाच्या भोवऱ्यात अडकली असून, पुलाखालून वाहून गेलेले पाणी पुन्हा पुलाच्या वरच्या भागात आणण्याचा प्रकार सरकारदरबारी सुरु झाला आहे. याची परिणीती राज्यातील जवळपास 20 लाख महिलांच्या लाभाला कात्री लावण्यात होणार आहे.

    सरसकट असल्याने या योजनेचा दुहेरी लाभ घेणाऱ्या किंवा निकषात न बसताही लाभ घेणाऱ्या महिलांच्या खात्यावरुन आता हे पैसे काढून पुन्हा सरकारी तिजोरीमध्ये वळते करण्यात येणार आहेत. त्यामुळे एका दणक्यात राज्यातील लक्षवधी महिला लाडक्या तर सोडाच थेट नावडत्या होऊ लागल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे पहिला दणका धुळे जिल्ह्यातील लाभार्थ्याला बसला आहे. येथील एका लाभार्थ्याच्या बँक खात्यावरुन साडेसात हजार रुपये थेट सरकारच्या तिजोरीत वळते करण्यात आली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *