• January 6, 2025
  • No Comment

खुन केल्याने आरोपीच्या घरात घुसून केली तोडफोड; वाघोलीतील गोरेवस्तीतील घटना

खुन केल्याने आरोपीच्या घरात घुसून केली तोडफोड; वाघोलीतील गोरेवस्तीतील घटना

    वाघोली (पुणे): मुलीशी पूर्वी बोलत असल्याचा राग मनात ठेवुन मुलीचे भाऊ व वडिलांनी मारहाण केल्याने गणेश धांडे याचा मृत्यु झाला होता. त्यामुळे चिडलेल्या धांडे यांच्या नातेवाईकांनी पेटकर यांच्या घरात शिरुन साहित्याची तोडफोड केली.

    ही घटना वाघोलीतील वाघेश्वरनगरमधील गोरेवस्तीत २ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता घडली.

    याबाबत मनिषा सुधीर पेटकर (वय ३०, रा. वाघेश्वरनगर, वाघोली) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी छाया वाघु धांडे, विमलबाई पवार, सुलोचना पवार, छाया धांडे यांची मुलगी व सुन यांच्यासह इतर ७ ते ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीशी बोलण्याच्या कारणावरुन गणेश वाघु धांडे (वय १७) याचा खुन करण्यात आला होता. याप्रकरणी वाघोली पोलिसांनी नितीन पेटकर, सुधीर पेटकर आणि लक्ष्मण पेटकर यांना अटक केली आहे. या खुनाचा राग मनात धरुन धांडे कुटुंबातील लोक पेटकर यांच्या घरी गेले. त्यांनी पेटकर यांच्या घराच्या दरवाजावर दगडाने मारले. दरवाजाची मोडतोड करुन अंगणातील मोटारसायकलवर दगडे मारुन मोडतोड केली. घरामध्ये प्रवेश करुन घरातील साहित्याची तोडफोड करुन नुकसान केले.

    सहायक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे तपास करीत आहेत.

    Related post

    समाजासाठी मोठं हृदय – कालिदास ढमढेरे यांची ५ लाखांची देणगी

    समाजासाठी मोठं हृदय – कालिदास ढमढेरे यांची ५ लाखांची…

    भीमनगर येथील गो-हे खुर्द येथे समाज मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर एक प्रेरणादायी घटना घडली आहे. स्थानिक उद्योजक मा. श्री. कालिदास (दादा)…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे: गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या निवडणुकीत यंदा एकूण ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार…
    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर गाड्यांचे अतिक्रमण; नागरिक त्रस्त

    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर…

    पुण्यातील कसबा पेठ परिसरात न्यू गंधर्व बँड या व्यवसायिकाकडून अनधिकृत शेड उभारणे, डेकोरेशनचे साहित्य सार्वजनिक जागांवर अस्ताव्यस्त ठेवणे आणि बँडच्या गाड्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *