• January 6, 2025
  • No Comment

दारुच्या नशेत वादावादीतून तिघांनी केले दोघांचे अपहरण; पोलिसांनी एक तासात तीन टोळकी केली जेरबंद

दारुच्या नशेत वादावादीतून तिघांनी केले दोघांचे अपहरण; पोलिसांनी एक तासात तीन टोळकी केली जेरबंद

    पुणे: दारुच्या नशेत वादावादी झाल्याने तिघा जणांनी तिघांकडील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतले. त्यांच्यातील दोघांना ओमनी गाडीत घालून त्यांचे अपहरण केले.

    सिंहगड रोड पोलिसांनी त्यांना तासाभरात शोधून अटक केली.

    सागर सुनिल शिरोळे (वय ३४, रा. भिमनगर, उत्तमनगर), गजानन विलास मोरे (वय २९, रा. धायरी) आणि विराज शांताराम भोसले (वय २६, रा. वारजे माळवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार पुणे सातारा महामार्गावरील ओमकार लॉजवळ येथे ३ जानेवारी रोजी पहाटे २ ते ४ या दरम्यान घडला.

    याबाबत लोणंद येथील एका १८ वर्षाच्या युवकाने सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे मित्र सातारा रोडवरील नर्‍हे येथील ओमकार लॉजजवळून पायी चालत जात होते. त्यावेळी ओमनी गाडीतून आलेल्या तिघांनी जतीन व आमीन यांना पकडून त्यांच्याकडील तीन मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतले. त्यांना हाताने मारहाण करुन शिवीगाळ केली़ धमकी देऊन त्यांना जबरदस्तीने ओमनी गाडीतून अपहरण केले. काही अंतरावर जतीन याला सोडून दिले होते. त्यानंतर आमीन याला घेऊन ते पळून गेले होते. याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन तिघांना अटक केली.अधिक तपासासाठी न्यायालयाने या तिघांना ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली आहे. पोलीस उपनिरीक्षक सागर पवार तपास करीत आहेत.तिघांना ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली आहे.

    पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर पवार करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *