• January 7, 2025
  • No Comment

पैसे देण्यास नकार देणार्‍या तरूणावर ब्लेडने वार; पुणे स्टेशन परिसरातील धक्कादायक घटना

पैसे देण्यास नकार देणार्‍या तरूणावर ब्लेडने वार; पुणे स्टेशन परिसरातील धक्कादायक घटना

    पुणे: पुणे रेल्वे स्थानक परिसरात गुन्हेगार आणि गर्दुल्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. लूटमारीबरोबरच नागरिकांवर सशस्त्र हल्ला होण्याच्या घटनाही वाढत आहेत. अशाच एका घटनेत एक फिरस्त्याच्या हल्ल्यात तरूण गंभीर जखमी झाला आहे.

    पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून फिरस्त्याने तरूणावर ब्लेडने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना ४ जानेवारीला रात्री पावणेअकराच्या सुमारास तुकाराम शिंदे वाहन तळावर घडली आहे.

    याप्रकरणी वडिथा गोविंदा नाईक (२८, रा. बिबवेवाडी ) याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांकडून फिरस्त्या हल्लाखोराचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. जखमी मजुरी काम करतो तर फिरस्ता मिळेल ते काम करतो.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार नाईक हे ४ जानेवारीला रात्री साडेदहाच्या सुमारास पुणे स्टेशन परिसरातील वाहनतळावरून पायी चालले होते. त्यावेळी एका फिरस्त्या गर्दुल्याने त्यांना गाठले. मला पैसे दे अशी मागणी त्याने नाईक यांच्याकडे केली.

    मात्र, त्यांनी पैस देण्यास नकार दिला, त्याचा राग आल्यामुळे फिरस्त्याने तरूणाच्या खिशात हात घालून ८०० रूपये घेतले. त्याला विरोध केला असता, हल्लेखोराने खिशातील ब्लेड काढून नाईक यांच्या तोंडावर मारून गंभीर जखमी केले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम तपास करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *