• January 7, 2025
  • No Comment

सराईताच्या जामीनासाठी दिली बनावट कागदपत्रे; ७ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

सराईताच्या जामीनासाठी दिली बनावट कागदपत्रे; ७ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

    हडपसरः लष्कर न्यायालयात सराइत चोरट्याला जामीन देण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर करण्यात आल्याचा प्रकार वानवडी पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी बनावट आधारकार्ड, शिधापत्रिका अशी बनावट कागदपत्रे जप्त केली. याप्रकरणी संतोष शंकरराव तेलंग (वय ३२, रा. शेवाळवाडी ग्रामपंचायत कार्यालयामागे, हडपसर) याच्यासह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी सोमनाथ कांबळे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर न्यायालयाचे स्थलांतर वानवडीतील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले आहे. सराइत चोरटा बच्चनसिंग जोगिंदरसिंग भोड याला कोंढवा पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. भोंडविरुद्ध चार गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यात भोंडला जामीन मिळवून देण्यासाठी लष्कर न्यायालयातील एका वकिलामार्फत तेलंग आणि साथीदारांनी बनावट कागदपत्रे सादर केली. कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. तेव्हा बनावट आधारकार्ड, शिक्षापत्रिका सापडल्या. चौकशीत बनावट कागदपत्रे सादर करुन जामीन मिळवून देण्याचा प्रकार उघडकीस आला.
    उपनिरीक्षक टोणे पुढील तपास करत आहेत.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *