- January 7, 2025
- No Comment
जमिनीच्या वादातून तरुणाचा खुनाचा प्रयत्न

मांजरी: जमिनीच्या मालकी हक्काच्या वादातून तरुणाला गजाने मारहाण करुन खूनाचा प्रयत्न केल्याची घटना मांजरी परिसरात घडली.
याप्रकरणी ३३ जणांविरुद्ध गु्न्हा दाखल केला. याबाबत महेश रामदास घुले (वय ३६,रा. आई बिल्डींग, मांजरी बुद्रुक) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ३३ जणांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घुले आणि त्यांच्या नात्यातील काही जणांचा जमिनीच्या मालकी हक्कावरुन वाद झाला होता. वादातून रविवारी रात्री दहाच्या सुमारास त्यांनी तक्रारदार घुले यांचा भाऊ अक्षय रामदास घुले (वय २८) याच्यावर हल्ला केला. त्याला गजाने बेदम मारहाण केली. मारहाणीत अक्षय गंभीर जखमी झाला. सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे तपास करत आहेत.