• January 7, 2025
  • No Comment

बिबवेवाडीत तरुणांवर कोयत्याने वार; पोलिसांकडून दोन टोळकी गजाआड

बिबवेवाडीत तरुणांवर कोयत्याने वार; पोलिसांकडून दोन टोळकी गजाआड

    बिबवेवाडी: वादातून दोन तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. गौरव राजेश मरकड (वय २४, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे.

    याप्रकरणी सक्षम बगाडे, सागर सरोज यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत गौरव मरकड याने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव याचा आरोपी सक्षम आणि सागर यांच्याशी वाद झाला होता. वाद मिटवण्याचा बहाणा करुन आरोपींनी गौरव आणि त्याच्या मित्राला सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास अप्पर इंदिरानगर येथील शिवतेज क्रीडा संघ चौकात बोलावून घेतले. त्यानंतर आरोपींनी गौरव आणि त्याच्या मित्रावर कोयत्याने वार केले.

    आरोपींनी केलेल्या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी पसार झालेले आरोपी सक्षम आणि सागर यांना अटक केली.

    पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे याप्रकरणाचा तपास करत आहेत.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *