- January 7, 2025
- No Comment
धक्कादायक! वास्तुदोष सांगण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार; मुलाला ट्रॅक्टरखाली चिरडण्याची दिली धमकी
पुणे: पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. वास्तुदोष सांगतो म्हणून एकटी महिला असलेल्या घरात शिरून तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार शहरातील विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत २७ नोव्हेंबर रोजी घडला आहे.
त्यानंतर आता याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे. याप्रकरणी ४३ वर्षीय आरोपीवर एका ३९ वर्षीय महिलेनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या ,माहितीनुसार, २७ नोव्हेंबर रोजी पीडित महिला ही घरात एकटी असताना आरोपी घरातील वास्तुदोष सांगतो या बहाण्याने महिलेच्या घरी आला. तिला जबरदस्तीने बेडरूमध्ये नेत तिच्यावर बलात्कार केला. तिने याबाबत पोलिसांना सांगेल, असे म्हटल्यानंतर त्याने तिला ‘तू खानदानी आहेस, तू असे करू शकत नाही, पोलिसांकडे जाऊ शकत नाही.
तू जर याबाबत पोलिसांना काही सांगितले, तर तुझ्या मुलाला ट्रॅक्टरखाली चिरडेल,’ अशी धमकी आरोपीने दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेचा पुढील तपास विमानतळ पोलीस करत आहेत.