• January 8, 2025
  • No Comment

भयंकर! कंपनीतील सहकाऱ्याकडून महिलेवर कोयत्याने जिवघेणे वार

भयंकर! कंपनीतील सहकाऱ्याकडून महिलेवर कोयत्याने जिवघेणे वार

    पुणे: राज्यात महिलांवर हल्ले सुरुच आहे. पुण्यात तासाभरापूर्वी कोयता गँगने एका तरुणावर वार करत त्याचा हाताचा पंजा तोडला होता. तरुणावरील हल्ल्याची घटना ताजी असताना आता एका महिलेवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे.

    पुण्यातील नामांकित आयटी कंपनीच्या पार्किंगमध्ये महिलेवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुणे शहरातील येरवडा भागातील एका कंपनीच्या पार्किंगमध्ये ही घटना आहे. महिलेवर तिच्याच सहकाऱ्याने कोयत्याने वार केले आहे. सदर महिलेवर त्यांच्याच कंपनीतील व्यक्तीने वार केला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. या हल्ल्यात जखमी झालेली महिला येरवडा भागातील आय टी कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये कार्यरत आहे.

    येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील WNS कंपनी आहे. रामवाडी येरवडा या भागात ही कंपनी आहे. या कंपनीच्या पार्किंगमध्ये आज संध्याकाळी ६.१५ वाजता त्याच कंपनीत काम करणाऱ्या शुभदा शंकर कोदारे या महिलेवर कोयत्याने वार करण्यात आले. या महिलेवर त्याच कंपनीत काम करणाऱ्या कृष्णा सत्यनारायण कनोजा याने कोयत्याने वार केले. दोघांमधील झालेल्या वादावरून धारदार हत्याराने तिच्या उजव्या कोपरावर वार करून तिला गंभीर जखमी केले. या महिलेला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

    या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *