• January 8, 2025
  • No Comment

धारधार शस्त्राने हल्ला झालेल्या शुभदा कोदारेचा मृत्यू, पुण्यातील आयटी कंपनीच्या पार्किंगमध्ये सहकाऱ्यानेच केला होता वार

धारधार शस्त्राने हल्ला झालेल्या शुभदा कोदारेचा मृत्यू, पुण्यातील आयटी कंपनीच्या पार्किंगमध्ये सहकाऱ्यानेच केला होता वार

    पुणे: पुण्यातील नामांकित आयटी कंपनीच्या पार्किंगमध्ये हल्ला झालेल्या शुभदा कोदारे (28 वर्षे) या तरुणीचा मृत्यू झाला आहे. अतिरिक्त रक्तस्त्राव झाल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.

    शुभदाच्या सहकाऱ्यानेच तिच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला होता. पैशाच्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. मंगळवारी सायंकाळी कंपनीच्या पार्किंगमध्ये ही घटना घडली. या प्रकरणातील आरोपी कृष्णा सत्यनारायण कनोजा (30 वर्षे) याला अटक करण्यात आली आहे.

    पुण्यातील नामांकित आयटी कंपनीच्या पार्किंगमध्ये शुभदा कोदारे हिच्यावर तिचा सहकारी कृष्णा सत्यनारायण कनोजा याने हल्ला केला. पुणे शहरातील येरवडा भागातील एका आयटी कंपनीत ही घटना घडली. यामध्ये शुभदा ही गंभीर जखमी झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

    दोघेही एकमेकांच्या ओळखीचे असून आर्थिक वादातून हे सगळं प्रकरण घडल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात पैशांची देवाण घेवाण झाली होती.

    मंगळवारी संध्याकाळी शुभदा तिचे काम संपवून पार्किंगमध्ये असलेल्या गाडीतून घरी जात होती. याच वेळी कृष्णा तिथे आला आणि त्याच्या हातात भाजी कापण्यासाठी वापरलेले चोपर होते. त्याने शुभदा हिला अडवले आणि उजव्या हाताच्या कोपऱ्यावर हल्ला केला. हा घाव इतका गंभीर होता की शुभदा तिथेच कोसळली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अधिक रक्तस्त्राव झाल्यामुळे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *