• January 8, 2025
  • No Comment

कात्रज येथील ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याच्या तयारीतील गुंड गजाआड, भारती विद्यापीठ पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

कात्रज येथील ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याच्या तयारीतील गुंड गजाआड, भारती विद्यापीठ पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

    कात्रज: कात्रज येथील राजेंद्र ज्वेलर्स या सराफी दुकानावर दरोडा टाकण्यासाठी जमलेले असताना पोलिसांनी छापा घालून ३ जणांना पकडले.

    तेव्हा अंधाराचा फायदा घेऊन तिघे जण पळून गेले होते. त्यानंतर तब्बल दीड महिन्याने सापडलेल्या गुंडाकडून भारती विद्यापीठ पोलिसांनी घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत.

    यश दीपक घोडके (वय १८, रा. सच्चाई माता, आंबेगाव) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे. २३ नोव्हेंबर रोजी दरोडा टाकण्यासाठी टोळके जमल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून यश बोरकर, प्रसाद कांबळे, आर्यन काळे यांना अटक केली होती. त्यांच्याकडून कोयता, पालघन, मिरची पुड, दुचाकी असे दरोड्याचे ५१ हजार रुपयांचा माल जप्त केला होता. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत ते कात्रज गावठाण येथील राजेंद्र ज्वेलर्स येथे दरोडा टाकणार होते. त्यावेळी यश घोडके व त्याचे दोन मित्र पळून गेले होते. पोलीस त्यांचा शोध घेत होते. तांत्रिक विश्लेषणावरुन पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, महेश बारवकर, सागर बोरगे, अभिनय चौधरी यांना आरोपी हा बालाजीनगर येथील शंकर महाराज वसाहत येथे असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी यश घोडके याला पकडले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने दोन घरफोड्याची कबुली दिली.

    सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी एस पाटील, पोलीस निरीक्षक(गुन्हे) संगीता देवकाते, राहुलकुमार खिलारे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, महेश बारवकर, सागर बोरगे, अभिनय चौधरी, चेतन गोरे, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सचिन गाडे, सचिन सरपाले यांनी केली आहे.

     

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *