• January 8, 2025
  • No Comment

वाकड: दत्त मंदिर रस्त्यावर संतप्त नागरिकांचा ठिय्या

वाकड: दत्त मंदिर रस्त्यावर संतप्त नागरिकांचा ठिय्या

    वाकड: दत्त मंदिर रस्त्यावरील शेकडो अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे महापालिकेच्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन पथकाने सोमवारी (ता. ६) जोरदार कारवाई करत हटविली. मात्र, कुठलाही मोबदला अथवा नोटिसा न देता थेट कारवाई करण्यात झाल्याचा आरोप करत शेकडो रहिवासी व व्यावसायिकांनी ठिय्या आंदोलन करत रस्ता अडविला.

    सध्या वाकड येथील दत्त मंदिर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झालेली अतिक्रमणे काढण्याबाबत महापालिकेच्यावतीने भोंग्याद्वारे सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र तरीही ते न काढल्याने सोमवारी कारवाईला सुरुवात झाली. एक पोकलेन, तीन जेसीबी व पाच डंपरच्या साहाय्याने बेधडक कारवाई करण्यात आली. परंतु; न्यू दत्तनगर येथे पूर्वीचा मोबदला अद्याप मिळाला नाही, असा आरोप करत जमलेल्या शेकडो रहिवासी व व्यावसायिकांनी वाकड दत्त मंदिर रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले. तसेच रस्ता अडवून धरला. तब्बल अर्धा तासाहून अधिक काळ रस्ता रोको केल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. अखेर काही अधिकाऱ्यांनी आंदोलकांसह बाधित रहिवाशांची भेट घेऊन मोबदल्याचा विषय मार्गी लावू तसेच कारवाईला एक दिवस वाढवून दिल्याचे आश्वासन देताच गर्दी पांगली.

    उपायुक्त मनोज लोणकर, ‘ग’ क्षेत्रीय अधिकारी श्रीकांत कोळप, कार्यकारी अभियंता संध्या वाघ, अशोक कुठे, अमोल पडलवार, वाकड ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर आदी उपस्थित होते.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *