- January 8, 2025
- No Comment
सिंहगड रोडवर ट्रक आणि दुचाकीची जोरदार धडक; अपघातात महिला गंभीर जखमी

सिंहगड रोड: पुण्यातील सिंहगड रोडवर अपघात झाला आहे. सिंहगड रस्त्यावर आनंदनगर चौकात झालेल्या या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. विठ्ठलवाडीकडून माणिकबागच्या दिशेने जात असलेल्या दुचाकीला ट्रकची धडक लागल्याने यात महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात असून सिंहगड रोड पोलीस अधिक तपास करत आहेत.




