• January 8, 2025
  • No Comment

सिंहगड रस्त्यावरील मसाज पार्लरवर छापा,मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय

सिंहगड रस्त्यावरील मसाज पार्लरवर छापा,मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय

    सिंहगड रोड: मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणला. सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात एका मसाज पार्लरवर छापा टाकून पोलिसांनी पार्लरचालक महिलेला अटक केली.

    जोयश्री नरेन तामोली (वय ३२, रा. नांदेड फाटा, सिंहगड रस्ता, मूळ रा. बामुनगाव, जि. जोराहाट, आसाम) असे अटक करण्यात आलेल्या मसाजपार्लर चालक महिलेचे नाव आहे. याबाबत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेतील सहायक पोलीस फौजदार छाया जाधव यांनी नांदेड सिटी (सिंहगड रस्ता) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात डे स्पा या मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी छापा टाकला. मसाज पार्लरमधून तरुणींना ताब्यात घेण्यात आले. तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी तामोली हिला अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोस तपास करत आहेत.

    शहरातील वेगवेगळ्या भागात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांंच्याकडे करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी मसाज पार्लरमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकारांवर कारवाईचे आदेश दिले होते.

    गेल्या वर्षभरात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय प्रकरणी ३३ गुन्हे दाखल करण्यात आले.

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *