• January 8, 2025
  • No Comment

पेट्रोल चोरीच्या संशयावरून तरुणाचा खून; नऱ्हेच्या माजी उपसरपंचाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

पेट्रोल चोरीच्या संशयावरून तरुणाचा खून; नऱ्हेच्या माजी उपसरपंचाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

    पुणे: पेट्रोल चोरल्याच्या संशयावरून वीस वर्षीय तरुणाला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात नऱ्हेगावाचे माजी उपसरपंच सुशांत सुरेश कुटे (रा. चैतन्य बंगला, मानाजीनगर, नऱ्हे) याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

    सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा आदेश दिला आहे. समर्थ नेताजी भगत (वय २०, रा. नन्हे) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

    याप्रकरणी नेताजी सो पान भगत यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथील मानाजीनगर भागात २५ नोव्हेंबर पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास कुटे यांच्या ऑफिससमोर हा प्रकार घडला होता. समर्थ हा त्याच्या गाडीतील पेट्रोल संपल्याने तो दुसऱ्या गाडीतून पेट्रोल काढत असल्याच्या संशयावरून आरोपी गौरव संजय कुटे व त्याच्या इतर दोन ते तीन साथीदारांनी त्याला लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले. यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता.

    याप्रकरणात, अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी कुटे याने न्यायालयात अर्ज केला होता. त्यास सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. गुन्हा झाल्यापासून सुशांत कुटे फरार आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या जबाबामध्ये त्याचे नाव आलेले आहे. गुन्ह्याच्या तपासासाठी त्याला अटक करणे गरेजेचे आहे. त्यामुळे जामीन फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद अॅड. बोबटकर यांनी केला. न्यायालयाने बचावपक्षासह सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत जामीन अर्ज फेटाळला आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *