• January 8, 2025
  • No Comment

ब्लाब्ला (BlaBlaCar) अ‍ॅपचे पिक पॉईंट शोधून कारवाई करा, परिवहन विभागाचा फतवा

ब्लाब्ला (BlaBlaCar) अ‍ॅपचे पिक पॉईंट शोधून कारवाई करा, परिवहन विभागाचा फतवा

    पुणे: एरवी एकट्यासाठी चारचाकी गाडी काढून मुंबई पुण्याला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कार पुलिंग करून पैसे वाचवण्याची सुविधा ब्लाब्ला ॲपेने उपलब्ध करून दिली होती. मुंबई पुणे नाशिक या शहरांमध्ये रोज प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना ही मोठी सोय झाली होती.

    त्यातच पैशांची, इंधनाची आणि सोबतच वेळेची बचत अशा कारणांमुळे अल्पावधीत हे ॲप प्रचंड लोकप्रिय झालं आणि त्याला प्रतिसाद ही मोठ्या प्रमाणावर मिळाला होता. पण आता परिवहन विभागाने नवा फतवा काढत ब्लाब्ला कारचे पिकअप पॉईंट शोधून त्यावर कारवाई करावी असे आदेश दिले आहेत. त्यासाठी अगदी खोटे प्रवाशी म्हणून नोंदी करून प्रवास करा आणि त्यानंतर कारवाई करा अश्या सूचना ही दिल्या आहेत. मात्र या आदेशावरून परिवहन विभागावर टीका सुरू झाली आहे. खाजगी वाहतूक करणाऱ्या वाहतूक दारांकडून मिळणारा मलिदा हाच खरा या आदेशामागचा उद्देश आहे, अशी टीका प्रवाशांकडून केली जाते आहे.

    परिवहन विभागाने दिलेल्या आदेशात काय म्हटलंय?

    ब्लाब्ला कार आणि तत्सम अॅप्सद्वारे खाजगी वाहनांचा व्यावसायिक वापर करून प्रवासी वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या अनधिकृत प्रवासी वाहतुकीची तपासणी व त्यावर कारवाई करण्यासाठी रस्ता सुरक्षा पथक क्रमांक १ ते ६ यांना पुढीलप्रमाणे तपासणीसाठी तैनात करण्यात येत आहे.

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *