• January 8, 2025
  • No Comment

उरुळी कांचन येथे चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच; तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद

उरुळी कांचन येथे चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच; तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद

    उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हाद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून बुधवारी (ता. 08) पहाटेच्या सुमारास अज्ञात तीन चोरटे हातात शस्त्रे घेऊन फिरत असल्याचे दिसून आले.

    घरात कोणी नसल्याची संधी साधत बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सुमारे पाऊणे तीन लाखांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना आश्रम रोडवरील आय.डी.बी.आय बँकेच्या वरती घडली होती. तसेच शुक्रवारी (ता. 27 डिसेंबर) एका बड्या राजकीय नेत्याची बुलेट चोरीला गेली आहे. या दोन्ही घटनेतील चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात आले आहे. फुटेजमध्ये चोरट्यांचे चेहरे दिसत असून अद्यापहि चोरट्यांचा तपास लागलेला नाही.

    उरुळी कांचन व परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ मागील एक ते दीड महिन्यांपासून सुरु आहे. दुचाकी गाड्या चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. तर सदनिकांचे कडी कोयंडे तोडून ऐवज चोरून नेण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिक अस्वस्थ झाले आहेत.

    दरम्यान, या चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या चोरट्यांच्या हातात मोठी कटावणी दिसून येत आहे. तर सदरचे चोर हे 30 ते 35 या वयोगटातील असल्याचा अंदाज असून त्यांनी डोक्याला काळ्या रंगाचे टोप घातलेले आहेत. चोरीच्या उद्देशाने ते रस्त्यावर वावरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये चित्रित झाले आहेत. सदर प्रकरणी अद्याप उरुळी कांचन पोलीस ठाण्यात याबाबत माहिती देण्यात आली नाही.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *