• January 8, 2025
  • No Comment

किरकोळ कारणावरून एकास मारहाण; पाच टाळकी जेरबंद

किरकोळ कारणावरून एकास मारहाण; पाच टाळकी जेरबंद

    दापोडी: आमच्या वाहनाला धडक का दिली असे म्हणत पाच जणांनी मिळून एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 5) रात्री आठ वाजताच्या सुमारास कासारवाडी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

    योगेश महादेव पोफळकर (वय 18), ओंकार संभाजी लांडगे (वय 23), श्रेयस बाळासाहेब लांडगे (वय 24), गौरव नरेश काशीद (वय 23), सनी राजेंद्र लांडे (वय 30, सर्व रा. कासारवाडी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. प्रवीण जालिंदर बंगे (वय 35, रा. पिंपळे सौदागर) यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रवीण हे त्यांच्या कारमधून पिंपळे गुरव येथे जात होते. कासारवाडी येथे आरोपींनी प्रवीण यांची गाडी अडवली. आमच्या गाडीला धडक का दिली असे म्हणत शिवीगाळ करून प्रवीण यांना मारहाण केली. या मारहाणीत प्रवीण यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली आहे. दापोडी पोलीस तपास करीत आहेत.

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *