• January 8, 2025
  • No Comment

एका स्टिकरवरून लागला नागरिकांना लुटणाऱ्या टोळीचा सुगावा, डेक्कन पोलिसांनी आवळल्या मुसक्या

एका स्टिकरवरून लागला नागरिकांना लुटणाऱ्या टोळीचा सुगावा, डेक्कन पोलिसांनी आवळल्या मुसक्या

    पुणे: पुण्यातील हनुमान टेकडीवर चोरट्यांनी महाविद्यालयीन युवतीला कोयत्याचा धाक दाखवून एक लाख रुपयांची सोनसाखळी हिसकावून नेल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

    पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून आणखी काही नागरिकांना लुटल्याचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

    याबाबत एका युवतीने (वय १७) डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती शनिवारी (ता. ४) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होकी. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही युवती एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ती मित्रासह दुपारी सेनापती बापट रस्त्यावरील हनुमान टेकडी परिसरात फिरण्यास गेली होती. त्यावेळी चोरट्यांनी या दोघांना कोयत्याचा धाक दाखवून शिवीगाळ केली.

    युवतीला मारहाण करून चोरट्यांनी तिच्याकडील एक लाख रुपये किमतीची २० ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावून नेली. याबाबत युवतीने सोमवारी (ता. ६) डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आवरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पुढील तपास सुरु केला.

    गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील हनुमान टेकडीवर फिरायला किंवा मॉर्निंग वॉक साठी जाणाऱ्या अनेकांना लुटण्याच्या घटना सातत्याने वाढल्या होत्या. या अनुषंगाने पुणे पोलिसांनी तपास करत असताना टेकडीवर चोरी, चेन स्नेचींग करणाऱ्या टोळीला आज जेरबंद केलं आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात ३ गुन्हे दाखल आहेत. ४ जानेवारीला हनुमान टेकडीवर फिरायला गेलेल्या एका तरुणीला कोयत्याचा धाक दाखवत लुटले होते. या गुन्ह्याचा तपास करत असताना डेक्कन पोलिसांनी ३ जणांना अटक केलीय. त्यांच्याकडून आत्तापर्यंत ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    तपास करत असताना आरोपी एक दुचाकी वापरत असल्याचे निष्पन्न झाले यावर एक स्टिकर सुद्धा असल्याचे दिसून आले. यावरून पुढे शोध घेत असताना पोलिसांना ही दुचाकी पांडवनगर पोलीस चौकीच्या समोर उभी असल्याचे दिसून आले. या दुचाकीच्या मालकीचा शोध घेतल्यानंतर पोलिसांना आरोपीपर्यंत पोहचण्यात यश आले.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *