• January 9, 2025
  • No Comment

भारती हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांनी केली तोडफोड, 86 वर्षाच्या वृद्धाच्या मृत्युच कारण

भारती हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांनी केली तोडफोड, 86 वर्षाच्या वृद्धाच्या मृत्युच कारण

    पुणे: ८६ वर्षाच्या वृद्धाचा घरी मृत्यु झाला. त्यानंतर त्याच्या मृत्युला हॉस्पिटल प्रशासन जबाबदार आहे, असा आरोप करुन नातेवाईकांनी हॉस्पिटलमधील सुरक्षा रक्षक, कर्मचारी यांना शिवीगाळ करुन हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली.

    हा प्रकार भारती हॉस्पिटलच्या आर्थो ओ पी डी बाहेर ७ जानेवारी रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता घडला.

    याबाबत डॉ. अंकिता अर्पित ग्रोवर (वय ३६) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी केनिया जैन, चंद्रप्रकाश व त्यांच्याबरोबरील ३ महिला आणि एका पुरुषावर महा़ वैद्यकीय सेवा संस्था अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

    याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती हॉस्पिटलमधील ओ पी डीत तेजराज जैन (वय ८६) यांना त्यांच्या नातेवाईकांनी २९ डिसेंबर रोजी आणले होते. तेजराज जैन यांचा पल्स रेट कमी झाला होता. त्यांना ब्लॉकेजही होते. असे असतानाही त्यांच्या नातेवाईकांनी आम्ही दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये नेतो, असे सांगून त्यांना दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये न नेता घरी घेऊन गेले. त्यानंतर ३० डिसेंबर रोजी त्यांचा घरीच मृत्यु झाला. त्यानंतर त्यांचे नातेवाईक केनिया जैन, चंद्रप्रकाश व इतर ३ महिला व १ पुरुष ७ जानेवारीला मध्यरात्री भारती हॉस्पिटलच्या आर्थो ओ पी डीमध्ये आले.

    डॉक्टरांनी योग्य निदान केले नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. ते कोणाचेही काही ऐकून घेण्यास तयार नव्हते. त्यांनी फिर्यादी डॉ. अंकिता ग्रोवर तसेच सोबतचे महिला सिक्युरिटी तृप्ती लोखंडे, श्रीदेवी डोईफोडे, निर्मला लष्कर व हॉस्पिटल प्रशासनामधील सुनिल दाते, अतुल शिंदे, चैतन्य दधस, प्रशांत होवाळे व इतरांना शिवीगाळ दमबाजी करुन आरडाओरडा केला. हॉस्पिटलमधील स्टुल उचलून घेऊन इलेक्ट्रिक पॅनेल रुमचे काचेवर मारुन तोडफोड करुन दहशत निर्माण केली. सहायक पोलीस निरीक्षक स्रेहल थोरात तपास करीत आहेत.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *