• January 9, 2025
  • No Comment

धक्कादायक अपघात.! ट्रकच्या धडकेत डॉक्टर महिलेचा मृत्यू

धक्कादायक अपघात.! ट्रकच्या धडकेत डॉक्टर महिलेचा मृत्यू

    उंड्री (पुणे): पुण्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. भरधाव ट्रकच्या धडकेने दुचाकी महिला जागीच ठार झाल्याची धक्क्कादायक घटना घडली आहे. ही घटना बुधवारी ८ जानेवारी रोजी उंड्रीतील कानडे नगर येथे साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

    या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. डॉ. प्रणाली तन्मय दाते (वय-३४ वर्ष, रा. अर्बन नेस्ट सोसायटी, उंड्री) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणाली दाते या साडे बारा वाजण्याच्या सुमारास उंड्रीकडून हांडेवाडीच्या दिशेने जात होत्या, यावेळी मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्या रस्त्यावर पडल्या असता त्यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेले. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.

    हा अपघात एवढा भीषण होता कि, डोक्यातून बाहेर आलेला मेंदू रस्त्यावर छिन्नविछिन्न झाला होता. ट्रक चालक पांडुरंग बलभीम भोसले (वय-३५ वर्ष, मूळ गाव तुळजापूर, धाराशिव) याने घटनास्थळावरून पळ काढला. फरार झालेल्या आरोपीला ‘सीसीटीव्ही’च्या मदतीने शोधून अटक करण्यात आली आहे, असे काळेपडळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल निंबाळकर यांनी सांगितले.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *