• January 9, 2025
  • No Comment

वडिलांच्या उपचाराच्या नावाखाली पैसे घेऊन तिने केला विश्वासघात; IT कंपनीतील शुभदा कोदारेचा खुनामागील नेमके कारण आले समोर

वडिलांच्या उपचाराच्या नावाखाली पैसे घेऊन तिने केला विश्वासघात; IT कंपनीतील शुभदा कोदारेचा खुनामागील नेमके कारण आले समोर

    पुणे: वडिलांना हाय शुगर आहे, त्यांच्या ऑपरेशनसाठी, ट्रिटमेंटसाठी पैसे लागत असल्याचे सांगून तिने कधी २५ हजार तर कधी ५० हजार रुपये असे कृष्णा सत्यनारायण कनोजा याच्याकडून तब्बल ४ लाख रुपये घेतले होते.

    याप्रकरणी शुभदाच्या बहिणीने येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. शुभदा आणि तिची बहिण या दोघी बहिणी आयटी सेक्टरमध्ये काम करतात. त्या पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. त्या मुळच्या कराडच्या राहणार्‍या आहेत. त्यांचे वडिल कराडला असतात. शुभदा आणि कृष्णा हे दोघे डब्ल्यु एन एस कंपनीत अकाऊंट विभागात असले तरी वेगवेगळ्या सेक्शनमध्ये काम करत होते. दोघांची २०२२ पासून ओळख होती. शुभदा हिने आपले वडिल मधुमेहाचे रुग्ण असून त्यांच्यावर उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे कृष्णाला सांगितले होते. शुभदा हिलाही लो शुगरचा त्रास होता. त्यामुळेच तिने आतापर्यंत लग्न केले नव्हते. वडिलांच्या आजाराचे कारण सांगून शुभदा हिने त्याच्याकडून २५ हजार, ५० हजार रुपये असे सातत्याने उसने पैसे घेतले होते. कृष्णा याने आपली सहकारी अडचणीत असल्याचे पाहून तिला वेळोवेळी मदत केली होती. कृष्णा याची शुभदाच्या बहिणीशी ओळख होती. त्यांच्यात प्रामुख्याने पैशांच्या कारणावरुनच बोलणे झाले होते.

    शुभदा कायम त्याच्याकडे पैसे मागत असून परत देण्याचे नाव काढत नव्हती. त्याच्याकडून तिने आतापर्यंत ४ लाख रुपये घेतले होते. त्यामुळे कृष्णाला संशय येऊ लागला होता. काही दिवसांपूर्वी तो कराडला जाऊन शुभदा हिच्या वडिलांना भेटला. या भेटीत त्यांना असा कोणताही मोठा आजार नव्हता. किंवा त्यांचे कोणतही मोठे ऑपरेशन झाले नसल्याचे सांगितले. वडिलांच्या आजारपणाचे कारण सांगून आपल्याकडून तिने इतके पैसे उकळले.

    शुभदा कोदारे हिचा खुन केल्याप्रकरणी पोलिसांनी कृष्णा सत्यनारायण कनोजा (वय २८, रा. खैरेवाडी, शिवाजीनगर) याला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने अधिक तपासासाठी त्याला १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *