• January 8, 2025
  • No Comment

शासकीय ठेकेदार विठ्ठल पोळेकर यांच्या निर्घुण हत्या करणारा मुख्य सुत्रधार गजाआड; स्थानिक गुन्हे शाखा व हवेली पोलीस पथकांची उल्लेखनीय कामगिरी

शासकीय ठेकेदार विठ्ठल पोळेकर यांच्या निर्घुण हत्या करणारा मुख्य सुत्रधार गजाआड; स्थानिक गुन्हे शाखा व हवेली पोलीस पथकांची उल्लेखनीय कामगिरी

    पुणे : डोणजे येथील शासकीय ठेकेदार विठ्ठल पोळेकर यांचे त्यांच्या घराजवळून अपहरण करुन त्यांची निर्घुण हत्या करुन मृतदेहाचे तुकडे करुन पाणशेत धरणाच्या पाण्यात फेकून देण्यात आले होते. या हत्याप्रकरणातील मुख्य सुत्रधार आणि सराईत गुन्हेगार योगेश भामे याला पकडण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. तब्बल पावणे दोन महिन्यांहून अधिक काळ तो पोलिसांना गुंगारा देऊन वेगवेगळ्या ठिकाणी लपून फिरत होता.

    विठ्ठल पोळेकर (वय ७०, रा. डोणजे) हे १४ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजता फिरायला बाहेर पडले असताना घराजवळून त्यांचे अपहरण करण्यात आले. त्यांचा खुन करुन मृतदेह खडकवासला धरणाच्या पाण्यात

    टाकून दिला होता. पायगुडेवाडी ते गोळेवाडी रस्त्याच्या कामाचा शासकीय ठेका पोळेकर यांनी घेतला होता. त्या कामात अडथळा करु नये, म्हणून योगेश ऊर्फ बाबु किसन भामे (वय ३२, रा. डोणजे) याने खंडणी म्हणून एक

    जेग्वार चार चाकी कार मागितली होती. ती न दिल्याने त्यांचा खुन करण्यात आला होता.

    विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण झाले तरी कार सध्या योगेश भामे याच्याकडे असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन हे अपहरण योगेश भामे यानेच केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी जबलपूरहून शुभम पोपट सोनवणे (वय

    २४, रा. चिंचोली गुरव, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर), मिलिंद देवीदास थोरात (वय २४, रा. बेलगाव ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) यांना ताब्यात घेतले होते. मुख्य आरोपी योगेश भामे हा फरार होता. त्याच्या शोधासाठी

    स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके तैनात करण्यात आली. ही पथके सातत्याने आरोपीचा शोध घेत असताना योगेश भामे हा कोल्हापूर येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथक कोल्हापूरला रवाना

    झाले. त्याच सुमारास भामे हा कोल्हापूरहून पुण्याकडे येत असल्याची माहिती मिळाली. सातारा ते पुणे रोडवरील सारोळा पुलाजवळील परिसरात स्थानिक गुन्हे शाखा व हवेली पोलीस पथकांनी सापळा लावून योगेश भामे

    याला पकडले. योगेश भामे याच्याविरुद्ध एकूण ९ गुन्हे दाखल आहेत हे गुन्हे आर्थिक लाभासाठी केलेले असून त्यामध्ये खुन, खुनाचा प्रयत्न, अपहरण, फसवणूक, अतिक्रमण, बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *