• January 8, 2025
  • No Comment

शरद मोहोळ टोळीचा सदस्य पिस्तुलासह हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात, दोन पिस्तूले आणि चार जिवंत काडतुसे हस्तगत

शरद मोहोळ टोळीचा सदस्य पिस्तुलासह हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात, दोन पिस्तूले आणि चार जिवंत काडतुसे हस्तगत

    हिंजवडी: पोलिसांनी शरद मोहोळ टोळीचा सदस्य असलेल्या विकी दीपक चव्हाण ला पिस्तुलासह बेड्या ठोकल्या आहेत. हिंजवडी पोलिसांनी मेझा नाईन हॉटेल जवळ ही कारवाई केली आहे. विकी चव्हाण कडे दोन पिस्तूले आणि चार जिवंत काडतुसे पोलिसांना मिळाली आहेत.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल मेझा नाईन जवळ काळ्या रंगाचा शर्ट घातलेला व्यक्ती हा कमरेला पिस्तूल लावून दुचाकी वर फिरत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ यांच्या टीमला मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी केंगले, गिलबिले, पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. खात्री करून आरोपी विकी दीपक चव्हाण ला ताब्यात घेतलं. पंचासमक्ष गुन्हेगार विकीची अंगझडती घेण्यात आली.

    कमरेला दोन पिस्तुले आणि खिशात चार जिवंत काडतुसे मिळाली आहेत. ती हिंजवडी पोलिसांनी जप्त केली आहेत. या घटने प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकी चव्हाण हा शरद मोहोळ टोळीसाठी काम करत असल्याची माहिती समोर आलेली आहे. अद्याप त्याच्यावर किती गुन्हे आहेत. हे समजू शकलेलं नाही. विकी चव्हाण ने पिस्तुल नेमकी कशासाठी बाळगली हे अद्याप समजू शकलेल नाही. त्याचा तपास देखील पोलीस करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *