• January 9, 2025
  • No Comment

अफिम विक्री करणारा सराईत गजाआड, अंमली पदार्थ विरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी, सव्वा दोन लाखांचा ऐवज हस्तगत

अफिम विक्री करणारा सराईत गजाआड, अंमली पदार्थ विरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी, सव्वा दोन लाखांचा ऐवज हस्तगत

    चंदननगर (पुणे): चंदननगर परिसरात अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तरुणाला पकडून पोलिसांनी त्यांच्याकडून सव्वा दोन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

    विजयसिंग खिंमसिंग राजपुरोहित (वय ३७, रा. क्रांतिपार्क, खराडी) असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडील बॅगमध्ये २ लाख २२ हजार रुपयांचा १११ ग्रॅम आफिम हा अंमली पदार्थ, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, रिकाम्या प्लॉस्टिकच्या पिशव्या आढळून आल्या.

    अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे व त्यांचे सहकारी मंगळवारी सायंकाळी चंदननगर परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी खराडी येथील पुजा सुपर मार्केटसमोरील रोडवर एक जण संशयास्पदरित्या थांबलेला दिसून आला. त्याच्याकडे ब्राऊन हँड बॅग होती. त्याच्या हालचालीवरुन पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्याला पकडून बॅगेची तपासणी केली. त्यात अफिम हा अंमली पदार्थ मिळून आला. चंदननगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल केला आहे.

    सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेशा बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार संदिप शिर्के, मारुती पारधी, प्रविण उत्तेकर, विशाल दळवी, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, विनायक साळवी, दया तेलंगे, रेहाना शेख, योगेश मोहिते यांनी केली आहे.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *