• January 9, 2025
  • No Comment

पूर्ववैमनस्यातून तरुणावर खुनी हल्ला, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पूर्ववैमनस्यातून तरुणावर खुनी हल्ला, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

    चाकण (पुणे): पुर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाच्या गळ्यावर वस्तार्‍याने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न दोघांनी केला. ही घटना चाकणजवळील मेदनकरवाडी येथे रविवारी (दि. 5) सकाळी घडली.

    सचिन श्रीराम आरेकर (26, रा. अमृतनगर, मेदनकरवाडी, ता. खेड, जि. पुणे) असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून, त्यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अभिषेक सोनवणे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) आणि ऋतिक ऊर्फ सायको (रा. अमृतनगर कॉलनी, मेदनकरवाडी, ता. खेड, जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास आरोपींनी पूर्वीचा भाडणाचा राग मनात धरून फिर्यादी आरेकर यांना जीवे ठार मारण्याचा कट रचला. त्यानुसार, आरोपी अभिषेक सोनावणे याने फिर्यादी आरेकरला फोनव्दारे संपर्क साधून तुला भेटायचं आहे. प्रेमाचा चहा जवळ ये, असे सांगितले. पडवळ बंधू दूध डेअरी फार्म समोर आरोपी सायको याने फिर्यादीस पाठीमागून मिठी मारली. त्यांना घट्ट पकडून ठेवले असता आरोपी सोनवणे याने आज याला सोडायचे नाही. याची विकेट टाकायची, असे बोलून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने धारदार वस्ता-याने फिर्यादीचे गळ्यावर व डाव्या हाताचे अंगठ्या शेजारील बोटावर वार करून जखमी केले. तसेच फिर्यादी आरेकर यांना शिवीगाळ, दमदाटी करत जोर-जोरात आरडाओरड करून आम्ही इथले भाई आहोत, अशी दहशत माजविली. या घटनेमुळे परिसरातील दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली.

    चाकण पोलिस पुढील तपास करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *