- January 10, 2025
- No Comment
रेकार्ड वरील गुन्हेगारास पिस्टल मॅग्जीनसह केल गजाआड, स्वारगेट पोलिसांची कामगिरी
स्वारगेट: स्वारगेट पोलिस ठाणेकडून बेकायदेशिर पिस्टल बाळगणा-या रेकार्ड वरील गुन्हेगारास अटक करण्यात आली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
पोउपनि संतोष तानावडे, पो. अ. सुजय पवार, पो. अ. हर्षल शिंदे, पो.अं. फिरोज शेख, पो. अ. शैलेश वाघमोडे हे ०४/०१/२०२५ रोजी सहाच्या सुमारास स्वारगेट पोलिस ठाणे हददीमध्ये पेट्रोलिंग करत होते. गिरीधरभवन चौक, डायसप्लॉट गुलटेकडी पुणे येथे असताना पो. अ. सुजय पवार, पो.अ. हर्षल शिंदे, पो.अं. फिरोज शेख, यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक जण डॉयसप्लॉट चौक रिक्षा स्टॅन्ड, गुलटेकडी येथे संशियत रित्या उभा असून, त्याच्या कमरेला हत्यार असण्याची शक्यता आहे. खात्रीशीर बातमी घटनास्थळी जावून पंचासह सापळा रचला. त्यावेळी पोलिसांची व पंचांची बातमीप्रमाणे खात्री झाल्याने वरील स्टाफच्या मदतीने रात्रौ २०:३५ वाजताचे सुमारास त्यास पकडले. पंचासमक्ष त्याचे नाव, पत्ता विचारता त्याने त्याचे नाव ऋत्वीक शशीकांत ससाणे (वय २४ वर्ष धंदा- शेती रा लक्ष्मी निवास सर्व्हे नं. ८८ ससाणे) असे असल्याचे सांगितले.
पंचासमक्ष त्याची अंगझडती घेता त्याच्या पॅन्टचे आतील बाजुस कबरेला एक पिस्टल मॅग्जीनसह व पॅन्टच्या खिशात एक जिवंत काडतुस मिळून आले. त्याचे जवळ पिस्टल बाळगण्याचा सक्षम अधिकाऱ्याचा परवाना आहे का? व ते कोठुन आणले? असे त्यास विचारले असता, त्याने त्याचेकडे असा कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे सांगुन उडवाउडवीची उत्तरे दिली. सदर व्यक्तीस पुढील कायदेशीर कार्यवाही करीता स्वारगेट पोलिस ठाणे येथे घेऊन गेलो. आरोपी ऋत्वीक शशीकांत ससाणे (वय २४ वर्ष धंदा- शेती रा लक्ष्मी निवास सर्व्हे नं. ८८ ससाणे वस्ती महमदवाडी रोड, हडपसर पुणे) याने स्वताः जवळ बेकायदेशिररित्या एक पिस्टल मॅग्जीनसह व एक जिवंत काडतुस जवळ बाळगताना मिळून
आला म्हणून स्वारगेट पोलिस ठाणे येथे गु.र. नं. ०२/२०२५ शस्त्र अधिनियम कलम ३/२५ सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७(१)/१३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी ही प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, विवेककुमार मासाळ, पोलिस उपआयुक्त, परिमंडळ ०२. पुणे शहर, राहुल आवारे, सहाय्यक पोलिस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली युवराज नांद्रे, वरीष्ठ पोलिस निरीक्षक, स्वारगेट पोलिस स्टेशन, पुणे शहर. राहुल कोलंबीकर, सहायक पोलिस निरीक्षक स्वारगेट पोलिस स्टेशन, पुणे शहर, संतोष तानावडे, पोलिस उप-निरीक्षक, रविद्र कस्पटे, पोलिस उप-निरीक्षक, पो. हवा. आश्रुबा मोराळे, पो. अं. प्रशांत टोणपे पो. अ. सुजय पवार, पो. अ. हर्षल शिंदे, पो.अं. फिरोज शेख, पो. अ. वाघमोडे, पो. अं. घुले, पो.अं. चव्हाण, पो. अं. खेदाड, पो. अं. दुधे, पो.हवा. तनपुरे यांचे पथकाने केलेली आहे.