- January 10, 2025
- No Comment
मोक्कामधून सुटलेल्या कुख्यात गुंडासाठी येरवडा परिसरात रॅली,आरोपी कसबे सह एकूण १२ जणांवर गुन्हा दाखल
येरवडा: पुण्यात मोक्काच्या आरोपाखाली तुरूंगात गेलेल्या आरोपीने सुटकेनंतर स्वागतासाठी बाईक रॅली काढली होती. ही रॅली काढणं आता त्याला चांगलच भोवलं आहे. कारण रॅलीचा झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर पुन्हा कारवाई केली आहे.
त्यामुळे आरोपी प्रफुल उर्फ गुड्या कसबेसह एकूण 12 जणांवर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सूरू आहे.
मोक्का मध्ये येरवडा जेलमध्ये असलेला प्रफुल उर्फ गुड्या गणेश कसबे हा २ दिवसांपूर्वी जेलमधून बाहेर आला. त्यानंतर त्याने आणि त्याच्या सुमारे ५०-६० समर्थकांनी येरवडा बाजार परिसरात आलिशान कारमधून रॅली काढली होती. या रॅलीची व्हिडिओ देखील त्याने बनवला होता आणि सोशल मीडियावर शेकर केला होता.
रॅलीचा झाल्यानंतर परिसरातील नागरिकांना रॅलीमधील युवकांनी धमकावले होते असे देखील नागरिकांचे म्हणणे आहे..आता बाप बाहेर आलाय, बॉस बाहेर आलाय म्हणून रॅलीमधील युवकांनी नागरिकांना शिवीगाळ केली होती. त्यानंतर नागरीकांनी व्हिडिओ आणि घडलेल्या घटनेची माहिती लक्ष्मी नगर (शास्त्रीनगर) पोलीस चौकीमध्ये दिली होती. पण कारवाई झाली नव्हती.
मात्र आता पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली आहे. मोक्का मध्ये आत असलेला आरोपी प्रफुल उर्फ गुड्या कसबेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी कसबे सह एकूण १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रॅली झाल्यानंतर पोलिसांनी अॅक्शन घेतली आहे.