- January 10, 2025
- No Comment
वाहन चोरीच्या मोडसवरुन सराईत चोरटा अटक, बिबवेवाडी पोलिसांनी 3 वाहनचोरीचे गुन्हे आणले उघडकी
पुणे: सीसीटीव्ही फुटेज तपासून त्यावरुन आरोपीचे मोडसवरुन पोलिसांनी सराईत वाहन चोरट्याला पकडले त्याच्याकडून तीन वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
यश ज्ञानेश्वर खलसे (वय १९, रा. आगम मंदिराजवळ, कात्रज) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून यामाहा एफझेड, होंडा शाईन व अॅक्टीव्हा अशा दीड लाख रुपयांच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील २ आणि कामशेत पोलीस ठाण्यातील एक अशा २०२४ मधील तीन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे व गुन्हे निरीक्षक मनोजकुमार लोंढे यांनी जुने उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेतला. त्यात वाहन चोरीचे काही गुन्हे होते. पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले व पोलीस अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटना ठिकाणी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपीचे मोडसवरुन हा गुन्हा यश खलसे याने केल्याचे निष्पन्न झाले. पोलीस अंमलदार ज्योतिष काळे व प्रणय पाटील यांना त्यांच्या बातमीदारांकडून यश खलसे याचा ठावठिकाण्याची माहिती मिळाली. पोलिसांनी जाऊन यश खलसे याला पकडले. चौकशीत त्याने तीन वाहन चोरीची कबुली दिली.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे, गुन्हे निरीक्षक मनोजकुमार लोंढे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलीस अंमलदार संजय गायकवाड, संतोष जाधव, ज्योतिष काळे, प्रणय पाटील, विशाल जाधव, आशिष गायकवाड, अजय कामठे, सुमित ताकपेरे यांनी केली आहे.