- January 11, 2025
- No Comment
गांजा विक्रीप्रकरणी दोन टाळकी गजाआड, गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी
पिंपरी: पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत गांजा विक्री प्रकरणी दोघांना अटक केली. आरोपींकडून सहा किलो गांजा जप्त केला आहे. ही कारवाई दिघी येथील गजानननगर येथे करण्यात आली.
गौरव नवले (वय २१), महेश आढाव (वय २१, दोघेही रा.सारोळा, श्रीगोंदा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. विकी खंडागळे ऊर्फ टकले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी येथील गजानन मंदिराच्या समोरील रस्त्यावर काहीजणांनी गांजा आणल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६ किलो ४१० ग्रॅम गांजा, दोन मोबाईल व एक दुचाकी असा एकूण ३ लाख ९० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या आरोपींनी हा गांजा खंडागळे याच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे सांगितले.