• January 11, 2025
  • No Comment

अनधिकृत पत्राशेडवर डुडुळगाव येथे धडक कारवाई

अनधिकृत पत्राशेडवर डुडुळगाव येथे धडक कारवाई

    चऱ्होली: ई क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र. तीन, डुडुळगाव येथील अनधिकृत पत्राशेड बांधकामावर अंदाजे ६१६८ चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

    पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग आणि ई क्षेत्रीय धडक कारवाई पथकामार्फत ही निष्कासनाची कारवाई करण्यात आली. शहर अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे यांनी कार्यकारी अभियंता सूर्यकांत मोहिते, उपअभियंता राजेश जगताप, कनिष्ठ अभियंता संदीप वैद्य यांच्या आधिपत्याखाली महापालिका अतिक्रमण धडक पथक, तीन बीट निरीक्षक, २३ महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान, एक पोलिस उपनिरीक्षक, पाच पुरुष पोलिस, चार महिला पोलिस, पाच मजूर यांच्या उपस्थितीत दोन जेसीबी यंत्रासह निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *