• January 11, 2025
  • No Comment

सेना दिवस संचलन परेड: येरवडा, विश्रांतवाडी, खडकी येथे पाच दिवस वाहतुकीत बदल

सेना दिवस संचलन परेड: येरवडा, विश्रांतवाडी, खडकी येथे पाच दिवस वाहतुकीत बदल

    पुणे: सेना दिवसाच्या संचलन परेडच्या पार्श्वभूमीवर येरवडा, विश्रांतवाडी आणि खडकी येथील काही रस्त्यावर तात्पुरता वाहतूक बदल करण्यात आला आहे. शनिवार (दि.11) ते बुधवार (दि.15) असा पाच दिवस सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत हा वाहतूक बदल असणार आहे.

    त्यामुळे वाहतूकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

    – शादलबाबा चौक ते चंद्रमा चौक ः शादलबाबा चौकाकडून चंद्रमा चौकामार्गे खराडीकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे वाहन चालकांनी आंबेडकर चौक,आळंदी जंक्शन, साप्रस जुना होळकर ब्रिज मार्गे पुढे जावे.

    – विश्रांतवाडी ते होळकर ब्रिजः विश्रांतवाडीकडून होळकर ब्रिजमार्गे खडकीकडे जाणारी वाहतूक बंद असणार आहे. त्यावेळी वाहनचालकांनी विश्रांतवाडी, साप्रस जुना होळकर ब्रिजमार्गे किंवा शादलबाबा, संगमवाडी, पाटील इस्टेटमार्गे जावे लागणार आहे.

    – खडकी ते होळकर ब्रिजः बोपोडी चौक खडकी बाजार मार्गे, चर्च चौक जनरल करीअप्पा मार्गावरून मेथलिक चर्च, अर्जुन मार्ग पाचवड चौक येथून पुढे होळकर ब्रिज मार्गे येरवडा, विश्रांतवाडीकडे येणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाकडेवाडी पाटील इस्टेट मार्गे जावे लागणार आहे.

    – पोल्ट्री फॉर्म चौक मार्गे होळकर ब्रिजः पोल्ट्री फॉर्म चौक पोल्ट्री अंडरपास कडून आठमुळा रोडला जाण्यासाठी प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. यावेळी वाहनचालकांनी वाकडेवाडी, पाटील इस्टेट-संगमवाडी, शादलबाबा मार्गे पुढे जावे लागणार आहे.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *