• January 11, 2025
  • No Comment

पुण्यातील ४८७ बांधकामप्रकल्पांना स्थगिती,सदनिकांच्या खरेदी-विक्री व्यवहारावर निर्बंध,पहा सविस्तर

पुण्यातील ४८७ बांधकामप्रकल्पांना स्थगिती,सदनिकांच्या खरेदी-विक्री व्यवहारावर निर्बंध,पहा सविस्तर

पुणे: राज्यातील १० हजार ७३३ गृहनिर्माण प्रकल्पांना महारेराने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. या नोटिशीला प्रतिसाद न देणाऱ्या राज्यातील १ हजार ९०५ प्रकल्पांना महारेराने स्थगिती दिली आहे.

यात पुण्यातील सर्वाधिक ४८७ प्रकल्पांचा समावेश असून, त्यांची बँक खातीही गोठविण्यात आली आहेत.या प्रकल्पातील सदनिकांच्या खरेदी-विक्री व्यवहारावर निर्बंधही आणण्यात आले आहेत . महारेरा अध्यक्ष मनोज सौनिक यांनी हि माहिती माध्यमांना दिली

श्री. मनोज सौनिक

अध्यक्ष, महारेरा

महारेराकडे गृहनिर्माण प्रकल्पाच्या नोंदणीच्या वेळी प्रकल्प पूर्ततेची दिलेली तारीख उलटून गेल्यानंतरही माहिती अद्ययावत न करणाऱ्या १० हजार ७७३ व्यापगत प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आल्या होत्या. या प्रकल्पांना अपेक्षित माहिती अद्ययावत करण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी देण्यात आला. या नोटिशींना ५ हजार ३२४ प्रकल्पांनी योग्य प्रतिसाद दिला. यापैकी ३ हजार ५१७ प्रकल्पांनी भोगवटा प्रमाणपत्र सादर केले आहे. याचवेळी ५२४ प्रकल्पांनी मुदतवाढीसाठी अर्ज केले आहेत. तसेच, १ हजार २८३ प्रकल्पांच्या प्रतिसादांची छाननी सुरू आहे, अशी माहिती महारेराने दिली आहे.नोटिशीला प्रतिसाद न देणाऱ्या राज्यातील १ हजार ९५० प्रकल्पांवर स्थगितीची कारवाई करण्यात आली आहे. त्यांचे बँक खाते गोठवण्यात आले आहे. याचबरोबर या प्रकल्पांशी संबंधित खरेदी-विक्री व्यवहार करण्यावरही निर्बंध लादण्यात आले आहेत. याबाबतच्या सूचना सहजिल्हा निबंधकांना देण्यात आल्या आहेत. याशिवाय प्रतिसाद न देणाऱ्या आणखी ३ हजार ४९९ प्रकल्पांवरील कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे, असेही महारेराने नमूद केले आहे.

महारेरा नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करताना प्रत्येक विकासकाला प्रकल्प पूर्ण होण्याची तारीख नोंदवावी लागते. प्रकल्प पूर्ततेच्या तारखेनंतर प्रकल्प पूर्ण झालेला असेल तर भोगवटा प्रमाणपत्रासह, प्रपत्र ४ सादर करावे लागते. प्रकल्प अपूर्ण असेल तर मुदतवाढीसाठीची प्रक्रिया सुरू करावी लागते. प्रकल्प सुरू करण्यातच काही अडचणी आलेल्या असल्यास प्रकल्प रद्द करण्यासाठी अर्ज करणे आवश्यक असते. प्रत्येक विकासकाला तिमाही आणि वार्षिक अशी विहित विवरण प्रपत्रे संकेतस्थळावर अद्ययावत करणे बंधनकारक आहे. मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या प्रकल्पांवर कारवाई केली जाते.

Related post

चरस, गांजाची विक्री करणारा टोळका जेरबंद, अंमली पदार्थ विरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी, चव्वेचाळीस लाखाचा माल हस्तगत

चरस, गांजाची विक्री करणारा टोळका जेरबंद, अंमली पदार्थ विरोधी…

पुणे : कात्रज परिसरातून चरस, गांजाचा मोठा साठा जप्त; अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी आलेल्या अरुण अरोराकडून 44 लाखाचा माल हस्तगत कात्रज: अंमली…
फरार अट्टल गुन्हेगार व त्याच्या साथीदारांवर मोक्का कारवाई,वारजे माळवाडी पोलिसांची लोणावळ्यात कारवाई

फरार अट्टल गुन्हेगार व त्याच्या साथीदारांवर मोक्का कारवाई,वारजे माळवाडी…

वारजे: जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी सह साथीदारांवर मोक्का कारवाई केली. त्यातून तो जामीनावर सुटल्यानंतरही त्याची गुन्हेगारी थांबत…
पिंपरी-चिंचवडमध्ये कंपनीला भीषण आग; आगीचे कारण अजुन अस्पष्ट

पिंपरी-चिंचवडमध्ये कंपनीला भीषण आग; आगीचे कारण अजुन अस्पष्ट

भोसरी: पिंपरी-चिंचवडच्या भोसरी एमआयडीसी परिसरात प्लास्टिक आणि रबर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली आहे. संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास आग लागल्याची माहिती अग्निशमन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *